
पुणे : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याबद्दल अवमानकारक भाषा वापरल्या बद्दल तसेच समाजात भडकाऊ भाषण करून सामाजिक भावना दुखावल्याबद्दल पुणे शहर डेक्कन पोलीस ठाण्यात आमदार भास्कर जाधव यांच्या विरोधात
गुन्हा दाखल झाला आहे.
या आधी रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक, रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे तसेच राजापूर पोलीस ठाण्यात देखील या संदर्भात पोलिसांना निवेदन देऊन भास्कर जाधव यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी भाजपच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे.














