सारस्वत स्नेहवर्धक मंडळ, रत्नागिरीतर्फे खाद्य पदार्थांसह गृहोपयोगी वस्तूंचे प्रदर्शन सुरु

रत्नागिरी : सारस्वत स्नेहवर्धक मंडळ, रत्नागिरीतर्फे
खाद्यपदार्थ आणि गृहोपयोगी वस्तूंच्या प्रदर्शनाचे आयोजन सारस्वत स्नेहवर्धक मंडळ, रत्नागिरी या सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थेतर्फे रत्नागिरीतील चोखंदळ ग्राहकांकरिता एकाच छताखाली सारस्वती पद्धतीने तयार केलेले चवदार मसाले, विविध पदार्थांची पीठे, लोणची, दिवाळी फराळाचे विविध नाविन्यपूर्ण पदार्थ, पापड, कुरडई, तयार कपडे, आकाश कंदील, काजूगर, उटणे, पणत्या, खाद्य पदार्थ आदी वस्तूंचे भव्य प्रदर्शन यशोधन अपार्टमेंट, गाळा नं. १, अभ्युदय नगर, नाचणे रस्ता, रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आले आहे.

हे प्रदर्शन दि. १९ ते २२ ऑक्टोबर या काळात सुरु शहरातील नागरिकांना खुले रहाणार आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन शहरातील सुप्रसिद्ध डॉ. शरद बोर्डवेकर यांच्याहस्ते संपन्न झाले. त्यांनी सर्व स्टॉलना भेटी देऊन स्टॉलधारक उद्योजकांचे विशेष कौतुक केले आणि सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष डॉ. किशोर सुखटणकर, निमंत्रक अॅड. संध्या सुखटणकर, उपाध्यक्ष श्री. संजय बांदिवडेकर, सचिव श्री. वसंत वाकडे, सदस्य श्री. नारायण आजगावकर, श्री. प्रदिप तेंडुलकर, सौ. विस्मया कुळकर्णी, श्री. उत्पल वाकडे, श्री. निनाद तेंडुलकर, स्टॉलधारक व्यावसाईक आणि नागरिक उपस्थित होते.

या उपक्रमाकरिता संस्थेला दुकान गाळा उपलब्ध करून देणारे श्री. सुनीलशेठ भोंगले यांचे संस्थेच्यावतीने आभार व्यक्त करण्यात आले. चार दिवस सुरु राहणाऱ्या या प्रदर्शनाचा रत्नागिरी शहरातील चोखंदळ ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष डॉ. किशोर सुखटणकर यांनी केले आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE