खेड : जल फाउंडेशन, कोकण विकास समिती आणि खेड तालुका कोकण रहिवाशी मंच दिवा शहर यांच्यावतीने रेल्वे प्रवाशांच्या समस्यांविषयी चर्चा करण्यासाठी गुरुवार दि. २७ ऑक्टोबर, २०२२ रोजी उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांची भेट घेण्यात येणार आहे. यावेळी कोकण रेल्वे प्रवाशांच्या मागण्या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करून रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा करण्याबाबत विनंती केली जाणार आहे जाणार आहे



चर्चेदरम्यान शिष्टमंडळाकडून केल्या जाणाऱ्या मागण्यांमध्ये पुढील मागण्यांचा समावेश आहे :
१. मुंबई ते चिपळूण दरम्यान नवीन गाडी सुरु करणे
२. पश्चिम रेल्वेवरून मुंबई सेंट्रल किंवा वांद्रे टर्मिनसवरुन वसईमार्गे सावंतवाडीसाठी नियमित गाडी सुरु करणे
३. पश्चिम रेल्वेवरील आणि दक्षिण व मध्य मुंबईतील प्रवाशांच्या सोयीसाठी ५०१०३/५०१०४ रत्नागिरी पॅसेंजर कोरोना पूर्वीप्रमाणे दादरपर्यंत चालवणे.
४. दिव्यासाठी काही अनारक्षित डबे राखीव ठेवून १०१०५/१०१०६ सावंतवाडी दिवा एक्सप्रेस पश्चिम रेल्वेवरील आणि दक्षिण व मध्य मुंबईतील प्रवाशांच्या सोयीसाठी दादरपर्यंत चालवणे
५. जनशताब्दी एक्सप्रेस, मंगला एक्सप्रेस, तेजस एक्सप्रेस, गरीबरथ एक्सप्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस करमळी एक्सप्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस कोचुवेली एक्सप्रेस, तिरुनेलवेली दादर एक्सप्रेस, मंगळूरू मुंबई एक्सप्रेस आणि हिस्सार कोइंबतूर एक्सप्रेस या गाड्यांना खेड येथे थांबा देणे
कोकण रेल्वेच्या प्रवाशांना भेडसावणाऱ्या समस्या संदर्भात ही पूर्व नियोजित भेट आणि शिष्टमंडळासोबत चर्चा गुरुवार दिनांक २७ ऑक्टोबर रोजी शेट्टी हाऊस, लोकमान्य टिळक नगर, भाटिया शाळेजवळ, पोयसर, कांदिवली, मुंबई ४००००६७ सकाळी ९ वाजता केली जाणार आहे.














