आंतरराष्ट्रीय कृष्णभावानामृत संघातर्फे आजपासून श्रीमद् भागवत महापुराण कथा सप्ताह

रत्नागिरी : आंतरराष्ट्रीय कृष्ण भावानामृत संघाच्या रत्नागिरी विस्तार केंद्रामार्फत दिनांक ९ ते १५ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत एमआयडीसीतील लायन्स हॉस्पिटल नजीकच्या श्री जगन्नाथ एंटरप्राइजेस येथील मंदिरात श्रीमद् भागवत महापुराण कथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

या निमित्त भगवान श्रीकृष्ण मंदिरात सप्ताह कालावधीत रात्री ७ ते ७.१५ या वेळेत महामंत्र कीर्तन, रात्री ७.१५ ते ९ या वेळेत श्रीमद् भागवत कथाकथन तर रात्री नऊ ते साडेनऊ या वेळेत भाविकांना महाप्रसाद या प्रमाणे कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे.

यावेळी भाविकांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE