कोकण रेल्वे मार्गावर शुक्रवारी मडगाव-मुंबई वनवे स्पेशल धावणार

कणकवली, रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण, खेड स्थानकावर थांबे


रत्नागिरी : गोव्यातील मडगाव जंक्शन ते मुंबईतील सीएसएमटी टर्मिनस दरम्यान दिनांक 11 नोव्हेंबर 2022 रोजी 17 डब्यांची वनवे स्पेशल एक्सप्रेस (01428) सोडण्यात येणार आहे.
या संदर्भात कोकण रेल्वे दिलेल्या माहितीनुसार ही गाडी मडगाव जंक्शन होऊन शुक्रवार दिनांक अकरा नोव्हेंबरला रात्री बारा वाजून 30 मिनिटांनी सुटून शुक्रवारीस ती दुपारी बारा वाजून पन्नास मिनिटांनी वाजता मुंबईतील सीएसएमटी स्थानकावर पोहोचेल. ही वन वे स्पेशल करमाळी येथील सावंतवाडी रोड, कणकवली, रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पनवेल, ठाणे तसेच दादर स्थानकांवर थांबे घेणार आहे.

एकूण 17 डब्यांची ही गाडी पंधरा स्लीपर तसेच दोन एसएलआर श्रेणीच्या च्या डब्यांसह धावणार आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE