नवी दिल्ली : दिल्ली येथील ४१ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्याचे उद्घाटन केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्या

प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. हा व्यापार मेळावा “वोकल फॉर लोकल, लोकल टू ग्लोबल” या संकल्पनेवर आधारित असून महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी मेळाव्यात सहभागी होत उपस्थित उद्योजकांशी संवाद साधला.














