हिंदु जनजागृती समिती प्रणित रणरागिणी शाखेकडून आयोजन
रत्नागिरी : सध्या महिलांवर अत्याचार व लव्ह जिहाद यामुळें महिला व मुली यांचे जीवन असुरक्षित बनले आहे. मुंबई – टिळक नगर येथील रूपाली चंदनशिवे व नुकतीच झालेली श्रद्धा वालकर हिची हत्या यांचा निषेध व लव जिहादच्या विरोधात रत्नागिरीत आंदोलन गुरुवार दि. १७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता आंदोलन करण्यात येणार आहे
हिंदू जनजागृती प्रणित रणरागिणी शाखेमार्फत या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. तमाम हिंदू बांधवांनी या आंदोलनात सहभागी होऊन आंदोलन यशस्वी करावे, असे आवाहन हिंदू जनजागृती समिती कडून करण्यात आले आहे. रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर येथील पार्किंग झोनमध्ये हे आंदोलन केले जाणार आहे.














