देवरूख : अखिल भारतीय मानवाधिकार समितीचे केन्द्रीय पदाधिकारी यांनी नुकताच जिल्हा दौरा करून समितीच्या कामाचा आढावा घेवून कार्यकर्ते व पदाधिकारी यांना मार्गदर्शन केले.
या समितीचे केन्दीय अध्यक्ष प्रमोद केसरकर. राष्ट्रीय निरिक्षण रामदास खोत. घन: शाम सांडीम आदी पदाधिकारी यांनी देवरूखात येवून जिल्हा व तालुक्यातील मानवाधिकार समितीच्या कामकाजाची माहीती घेवून स्थानिक पदाधिकारी यांना मार्गदर्शन केले.. यावेळी जिल्हाध्यक्ष तेजस भोपळकर यांनी त्याचे स्वागत केले.

यावेळी राज्याचे कार्याध्यक्ष बाळकृष्ण वनकर, पंढरीनाथ मोहिरे. ग्रामसेवक संघटनेचे नेते व मानवाधिकार समितीचे जिल्हा सरचिटणीस शेखर जाधव. मारूती राऊत. विजय आंब्रे आधि उपस्थीत होते.














