भाजपच्या महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा सौ. चित्रा वाघ २६ रोजी रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर

रत्नागिरी येथे महिला मेळाव्यास उपस्थित राहणार


रत्नागिरी : भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेशाच्या महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा सौ.चित्रा वाघ या हा पदभार स्वीकारल्या नंतर प्रथमच रत्नागिरी कोकण दौऱ्यावर 26 नोव्हेंबर रोजी येणार आहेत. या दिवशी रत्नागिरी शहरातील नगर वाचनालय, जयस्तंभ, रत्नागिरी येथे दुपारी 2:30 ते 5:30 या वेळेत त्यांच्या उपस्थितीत महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

संग्रहित फोटो

या महिला मेळाव्यासाठी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष ऍड. दीपक पटवर्धन, तसेच देवरुख नगर पंचायत नगराध्यक्षा सौ. मृणाल शेट्ये हे उपस्थित राहणार असून महिलांनी या मेळाव्यासाठी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन भाजपच्या महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ.ऐश्वर्याताई जठार, महिला मोर्चा सरचिटणीस सौ.शिल्पा मराठे, महिला तालुकाध्यक्ष सौ. तनया शिवलकर, महिला शहराध्यक्ष सौ. सोनाली आंबेरकर यांनी केले आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE