ब्रेकफेल झालेली क्रेन चालकाने इतरांना वाचवण्यासाठी घातली खड्ड्यात !

रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील हातखंबा हायस्कूलजवळ भरधाव क्रेनचे ब्रेक निकामी झाल्यामुळे चालकाने प्रसंगावधान राखून क्रेन एका बाजूला घेत गटारात ननेऊन अपघात केला. हा अपघात रविवारी दि.20 नोव्हेंबर रोजी  सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडला.  इतरांना वाचवण्यासाठी चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानाचे कौतुक होत आहे.

प्रत्यक्षदर्शनी दिलेल्या माहितीनुसार, ब्रेक निकामी झालेली क्रेन पालीच्या दिशेने जात असताना हातखंबातील उतारात अचानक ब्रेक निकामी झाल्याचे चालकाला लक्षात आले. चालकाने हायस्कूलजवळ गाडीचा वेग कमी करण्याचा प्रयत्न केला. काही अंतरावरच गतिरोधक असल्याने ट्रॅफिक जाम होत असतानाही गाडी नियंत्रणात आणण्यासाठी चालकाने प्रयत्न केले. मात्र  रस्त्याच्या एका बाजूला दरी व उतार असल्याचे लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान राखून गाडी डाव्या बाजूला घेत रस्त्याच्या गटारात उतरवून अपघात केला. सुदैवाने या अपघातात कोणालाच दुखापत झाली नाही. जर चालकाने क्रेन बाजूला घेत हा अपघात घडवून आणला नसता तर गतिरोधकावर ट्रॅफिकमध्ये असलेल्या गाड्यांना धडक देऊन चार ते पाच गाड्या चिरडण्याची शक्यता होती. परंतु चालकाच्या प्रसंगावधानाने ब्रेक निकामी झाल्यानंतरही क्रेनवरील ताबा न सोडता रस्त्याच्या कडेला क्रेन घेऊन अपघात केल्याने सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे. यामुळे चालकाचे वाहनचालकांकडून कौतुक केले जात आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE