८५ व्या कविसंमेलनात बाळाराम म्हात्रे यांचे प्रतिपादन
उरण, (विठ्ठल ममताबादे ) : कोकण मराठी साहित्य परिषद, मधुबन कट्टा चे प्रत्येक महिन्याच्या १७ तारखेला विमला तलाव येथे कविसंमेलन होते. या कवी संमेलनांचा वेगळा आनंद उरणचे आम्ही श्रोते घेतो, असे मत बाळाराम म्हात्रे यांनी मांडले.हे ८५ वें कविसंमेलन कमलाकर म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. कार्यक्रमाचे रंगतदार सूत्रसंचालन म. का. म्हात्रे यांनी केले.


यावेळी रायगडभूषण प्रा. एल.बी.पाटील, चंद्रकांत मुकादम, बाळाराम म्हात्रे,अनंत पाटील,मोहनलाल म्हात्रे, नारायण भोईर यांनी विचार मांडले.कविसंमेलनात मारुती तांबे,मोहनलाल म्हात्रे,रामचंद्र म्हात्रे,भगवान पोसू,अरुण शिवकर, सी.बी म्हात्रे,अरुण म्हात्रे,संजय पाटील, मच्छिंद्र म्हात्रे,अनंत पाटील यांच्यासह निमंत्रित कवी भरत पाटील,संग्राम दानवेकर यांनी खड्ड्यातले रस्ते या विषयावर कविसंमेलन बहारदार केले.














