रायगड जिल्हा शालेय बुद्धिबळ स्पर्धेत उरण तालुका चेस असोसिएशनचे यश

उरण दि 25(विठ्ठल ममताबादे ): गुरुवार दिनांक 24 नोव्हेंबर 2022 रोजी रायगड जिल्हा क्रीडाधिकारी यांच्या (D S O)  वतीने घेण्यात आलेल्या शालेय बुद्धिबळ झोनल (विभागीय ) निवड स्पर्धा क्रीडा संकुल अलिबाग येथे घेण्यात आली.या स्पर्धेत अंडर 14 या गटात कु. बिशानी पाटील रोटरी  स्कूल उरण येथील विद्यार्थी 6 पैकी 5 गुण मिळवून जिल्ह्यात तिसरी आली.तर 19 वर्ष खालील मुलींच्या गटात जिल्ह्या मध्ये कु सारा प्रशांत पाटील द्वितीय,कु दिव्या पाटील तृतीय सेंटमेरी हायस्कूल उरण,कु.तन्वी सुनील कुंभार यू.ई.एस  (UES) स्कूल उरण ही पाचवी आली आहे.

बुद्धिबळ स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी केल्याने या सर्व विजेते विद्यार्थिनींची  विभागीय (झोनल )स्पर्धा साठी निवड झाली आहे.या सर्व विद्यार्थिनींना उरण तालुका चेस असोसिएशन चे अध्यक्ष संदीप पाटील यांचे विशेष मार्गदर्शन मिळाले आहे.बुद्धिबळ स्पर्धेत मिळालेल्या या घवघवीत यशाबद्दल शिक्षण क्षेत्रातून तसेच इतर क्षेत्रातून या विद्यार्थिनीचे सर्वत्र कौतुक होत आहे.विविध क्षेत्रातून त्यांच्यावर शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE