साखरेची पोती घेऊन जाणार ट्रक हातखंबा येथे उलटून दोघे जखमी

मुंबई-गोवा महामार्गावरील दुर्घटना

नाणीज, दि.२५ : मुंबई – गोवा महामार्गावर हातखंबा येथील दर्ग्याजवळील (गुरववाडी) तीव्र उतारावर साखरेने भरलेला ट्रक नियंत्रण सुटून सुमारे दीडशे फूट खाली कोसळला. त्यात चालक आणि ड्रायव्हर जखमी झाले आहेत. शनिवारी सकाळीव११.३० च्या सुमारास हा अपघात झाला.

या संदर्भात अधिक माहितीनुसार ट्रक नंबर एमएच ५०-९४९५ सोलापूर, मंगळवेढा मार्गे जयगडला चालला होता. हातखंबा येथे दर्ग्याजवळील तीव्र उतारावर ब्रेक फेल झाल्याने तो १५० फूट खाली कोसळला. त्यात शिवाजी श्रीरंग शिंदे,वय-३२, रा. मंगळवेढा, जि. सोलापूर व क्लिनर दादा मनोहर मेटकरे, वय २७, हे दोघे जखमी झाले. त्यांना जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या हातखंबा येथील रुग्णवाहिकेतून रत्नागिरीतील जिल्हा रुग्णालय दाखल केले आहे.
या अपघातातील ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातील पोती बाहेर अस्ताव्यस्त पडली आहेत. या ठिकाणी नेहमी अपघात होत असतात. सुसाट वेग, तीव्र उतार, यामुळे चालकाचे नियंत्रण सुटत असते व अपघात होत असतात.
फोटो ओळी-
हातखंबा येथे शुक्रवारी १५० फूट खोल कोसळलेला साखर पोती घेऊन जाणार ट्रक.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE