उरण,(विठ्ठल ममताबादे): महाराष्ट्र वीरशैव सभा ठाणे जिल्हा व वीरशैव लिंगायत सेवा संस्था ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने वीरशैव लिंगायत धर्मातील सर्व पोट जातीतील इच्छुक वधू वरांचा व पालकांचा 33 व्या परिचय मेळाव्याचे आयोजन रविवार दिनांक 11/12/2022 रोजी धर्मवीर आनंद दिघे सभागृह, गांधीनगर(डोंबिवली रेल्वे स्टेशनपासून 10 मिनिटाच्या अंतरावर ), डोंबिवली (पूर्व ) येथे सकाळी 10 तें दुपारी 4 या वेळेत करण्यात आले आहे.
सकाळी 10 वा. नवीन नाव नोंदणी व दुपारी 12 वाजता परिचय सुरु होणार आहे. ज्या ज्या इच्छुक वधू वरांना नाव नोंदणी करायचे आहे. त्यांनी खालील पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
बी. डी. अळगी – 9664142412,
शांतकुमार लच्याने -7719822994,
प्रदीप निलाखे -9029248713,
सिद्धेश्वर लिगाडे -7666047588















