महाराष्ट्र पोलिस बॉइज संघटना उरणतर्फे २६/११ तील शहिदांना श्रद्धांजली

उरण दि. २७ (विठ्ठल ममताबादे ) : मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अनेक पोलिस अधिकारी कर्मचारी व जवान शहिद झाले. त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्र पोलिस बॉईज संघटनेतर्फे 26/11/2022 रोजी शहिद दिन साजरा करण्यात आला. शहिदांचे स्मरण भावी नविन पिढीलाही रहावे व देशाप्रती आपल्या कर्तव्याची जाणीव नेहमी राहावी, या दृष्टीकोनातून 26/11 च्या दहशतवादि हल्ल्यातील अधिकारी, जवानांना उरण पोलिस स्टेशन येथे संध्याकाळी 7.30 वाजता श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

शनिवार दि 26/11/2022 रोजी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना उरण तर्फे संध्याकाळी 6:30 वाजता उरण पोलीस लाईन नागाव ते उरण पोलिस स्टेशन पर्यंत हातात मेणबत्ती तसेच बॅनर, फलक घेऊन भव्य अशी रॅली काढण्यात आली. उरण पोलीस स्टेशन येथे शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.देशभक्ती गीतांचा कार्यक्रमही झाला. यावेळी विविध संख्या संघटना सहभागी झाल्या होत्या. उरण पोलिस स्टेशन मार्फतही यावेळी शहिदांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.प्रत्येक व्यक्तीने शहीदांच्या प्रतिमेवर पुष्प अर्पण करून मेणबत्ती लावून शहीदांना वदंन करून शहीदांच्या कार्याचे समरण केले.यावेळी न्हावा शेवा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस आयुक्त धनाजी क्षीरसागर, उरण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनिल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी 2 मिनिट स्तब्ध उभे राहून सर्वांनी शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली . महाराष्ट्र पोलिस बॉईज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राहुल दुबाले यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना उरण तालुका अध्यक्ष वैभव पवार,तालुका उपाध्यक्ष गणेश पाटील(अध्यक्ष पोलीस लाईन बॉईज संघटना ), तालुका सचिव हेमंत सुर्यराव,आय.टी.सेल प्रमुख निलेश गोहिल, संपर्क प्रमुख-वैभव तिलोरे, उपसचिव – रविंद्र मोकल, युवा आघाडी अध्यक्ष स्वप्नील कुंभार , महिला युवा अध्यक्ष समृद्धी गोडे,उपाध्यक्ष धनेश मळगावकर, सचिव मयूर पाटील,उपसचिव वैभव मोरे, महीला आघाडीचे अध्यक्ष एडव्होकेट प्रिती भारती(रांजणे),उपाध्यक्ष – स्नेहा गोडे, सचिव नविना भोईर, उपसचिव – माधुरी पाटील आदी महाराष्ट्र पोलिस बॉईज संघटना उरणच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE