रत्नागिरी : केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे तसेच राज्याचे उद्योग मंत्री रत्नागिरी- रायगड जिल्ह्यांचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या मुंबईतील भेटीदरम्यान विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

राजाचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची बुधवारी मुंबईत सदिच्छा भेट घेतली. केंद्राच्या माध्यमातून राज्यातील उद्योग व्यवसायांना चालना देण्यासाठी यावेळी चर्चा करण्यात आली, असे सांगण्यात येत आहे. ना. उदय सामंत यांच्याकडे रत्नागिरी तसेच रायगड या दोन्ही जिल्ह्यांचे पालकत्व असल्यामुळे महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री आणि या दोन्ही जिल्ह्यांचे पालकमंत्री म्हणून विविध विषयांवर ना. सामंत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याशी चर्चा केली.














