रत्नागिरी : कोकण रेल्वेमार्गे धावणारी आणखी एक गाडी शुक्रवार दिनांक 2 डिसेंबरपासून डिझेल ऐवजी विद्युत इंजिनसह धाऊ लागली आहे.
जबलपूर ते कोईमतुर दरम्यान धावणारी साप्ताहिक एक्सप्रेस (02198) ही गाडी दिनांक 2 डिसेंबरच्या फेरीपासून विद्युत इंजिन सह धावू लागली आहे. कोईमतूर ते जबलपूर या मार्गावर (02197) ही गाडी सोमवार दिनांक 5 डिसेंबर रोजी विजय वरील आपला पहिला प्रवास सुरू करणार आहे.
कोकण रेल्वेच्या संपूर्ण मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने या मार्गावरील प्रवासी गाड्या या डिझेल ऐवजी विद्युत इंजिन जोडून चालवल्या जात आहेत. शुक्रवारपासून जबलपूर- कोईमतुर विकली एक्सप्रेस विद्युत इंजिन सह धावण्यास प्रारंभ झाला आहे.















