देवरूख (सुरेश सप्रे) : संगमेश्वर तालुक्यातील निवे गावातील विकास काम करताना तेथील ग्रामस्थांची स्मशानभूमी जाणा-या रस्त्याची आग्रहाची मागणी होती. स्मशानभूमीकडे आडवळाने वाट काढत जावे लागत असलेने ग्रामस्थांना ते खुपच त्रासदायक ठरत होते. हा रस्ता करणे अत्यावश्यक होते. नवयुवकांची खेळाच्या मैदानाची मागणी होती त्यासाठी गावातील तरुण वर्ग व क्रीडाप्रेमी यांचा मैदानासाठीचा सततचा पाठपुरावा चालू होता. विकास कामे करणे हे तर लोकप्रतिनिधींचे कर्तव्यच आहे, असे प्रतिपादन यावेळी आ. शेखर निकम यांनी केले.
टेमकरवाडी रस्ता, सरोदेवाडी रस्ता, सरोदेवाडी समाज मंदिर बांधणे ही विकास कामे आमदार स्थानिक निधी, कोयना भूकंप अंतर्गत पाठपुरावा करुन त्यासाठीचा निधी आमदार शेखर निकम यांच्या माध्यमातून उपलब्ध करुन आणण्यात आला. त्यांची भूमिपुजने आज करण्यात आली.
यावेळी सुरेश(बारक्या शेठ) बने , रामभाऊ कुवळेकर, सरपंच कल्याणी जोशी, उपसरपंच अमोल जाधव, ग्रा. प. सदस्य संचिता कुवळेकर, नीलम जाधव, स्मिता महाडिक, वैभव सुर्वे, बाळकृष्ण पाले, सेजल रसाळ, ग्रामस्थ इ. उपस्थित होते
















