आज सायंकाळी रत्नागिरीत हिंदू राष्ट्र जागृती सभा
रत्नागिरी : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शनिवार ३ डिसेंबर २०२२ या दिवशी सायंकाळी ५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम, मारुती मंदिर रत्नागिरी येथे आयोजित हिंदू राष्ट्र जागृती सभेचे निमंत्रण शुक्रवारी श्रीक्षेत्र नाणीजधाम येथे स्वस्वरूप संप्रदायाचे उत्तराधिकारी प.पू. कानिफनाथ महाराज यांना देण्यात आले.
यावेळी प.पू. महाराज म्हणाले,”हिंदूंचे राष्ट्र आणि धर्म यांसंबंधीचे प्रबोधन करणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी सनातन संस्था आणि हिंदू जनजागृती समिती जे कार्य करत आहेत ते खूपच चांगले आहे. माझे 3 डिसेंबर रोजी रत्नागिरी येथे होणाऱ्या हिंदू राष्ट्र जागृती सभेला आशीर्वाद आहेत.”
यावेळी हिंदू जनजागृती समितीचे सर्वश्री वसंत दळवी आणि संजय जोशी उपस्थित होते.
सनातनचे संत सद्गुरू सत्यवान कदम यांनी प.पू.कानिफनाथ महाराज यांचा सत्कार केला.
हिंदू राष्ट्र जागृती सभेबाबत अधिक माहितीसाठी
श्री.विनोद गादीकर, हिंदू जनजागृती समिती करीता,रत्नागिरी. संपर्क-9422050560.















