वाळू माफियांविरुध्द धडक कारवाईत कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल जप्त

पनवेल, तळोजा, खारघर, खाडीमध्ये कारवाई

अलिबाग : जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या निर्देशान्वये अप्पर जिल्हाधिकारी अमोल यादव याच्या नेतृत्वाखाली पनवेल, तळोजा, खारघर, खाडीमध्ये वाळू माफियांविरुध्द काल दि.1 डिसेंबर 2022 रोजी धडक कारवाई करण्यात आली असून यामध्ये 4 मोठया बार्ज, 4 मध्यम बार्ज व 2 छोटया संक्शन पंपच्या बोटी अशा 10 बोटीवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.


खारघर पोलीस ठाणे यांच्या ताब्यात 6 बार्ज देण्यात आल्या असून संबधितांवर 41 डी अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. 2 बोटी एन.आर.आय. पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्या असून संबधितांविरुध्द एन.आर.आय. पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 1 बोट गाळामध्ये फसली असल्याने ती बोट जागेवरच नष्ट करण्यात आली व 1 बोट एन.आर.आय. ताब्यात घेतली असून त्याबाबतची पुढील कार्यवाही चालू आहे. तसेच 5 संक्शन पंपही नष्ट करण्यात आले.

या कारवाई अंतर्गत कोटयवधी रुपयांचा मुद्देमाल पाण्यामधून जप्त करुन संबधित पोलीस स्टेशनच्या ताब्यात देवून गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE