मनसेकडून हातखंबा ते रत्नागिरी बाईक रॅली
रत्नागिरी : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी दौऱ्यावर आलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांचे हातखंबा तिठा येथे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. राज ठाकरेंचे आगमन होताच ठाकरेंनी हात उंचावत कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा देत परिसर दणाणून सोडला होता. हातखंबा येथे कार्यकर्त्यांनी स्वागत केल्यानंतर मनसेची दुचाकी रॅली हातखंबा ते माळनाका अशी काढण्यात आली.
शनिवार 3 डिसेंबर रोजी सायंकाळी रत्नागिरीत त्यांचे आगमन झाले. रत्नागिरीचे प्रवेशद्वार असलेल्या हातखंबा तिठा येथे दुपारपासूनच कार्यकर्ते जमण्यास सुरुवात झाली होती. सायंकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास राज ठाकरे यांचा ताफा हातखंबा तिठा येथे पोहोचला. यावेळी त्यांचे जोरदार स्वागत केले. पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता.

राज ठाकरेंच्या स्वागतासाठी दोन दिवस अगोदरपासून स्वागताची तयारी सुरु आहे. कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे, उत्साहाचे वातावरण आहे. दरम्यान मुंबई – गोवा महार्गावर राज ठाकरेंच्या स्वागतासाठी बॅनर्स, झेंडे लावण्यात आले आहेत. या दरम्यान ठिकठिकाणी त्यांचे स्वागताचे झेंडे घेऊन कार्यकर्ते उपस्थित होते. माळनाका येथे शासकीय विश्रामगृहात त्यांचे रात्री 8.30 वा. च्या सुमारास आगमन झाले. यावेळी कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती.
यावेळी रत्नागिरी तालुकाध्यक्ष रुपेश जाधव, उपाध्यक्ष राजू पाचकुडे, विभाग अध्यक्ष पांडुरंग आंबेकर, मनविसे अध्यक्ष अखिल शाहू, अजिंक्य केसरकर, सोहम पिलणकर, सुनील पारकर, रिजवान मुकादम, सागर पावसकर, नितीश गैमार, सत्यजित खाडे, महिला तालाकध्यक्षा पियंका आखाडे, महिला तालुकाध्यक्षा, तालुका सचिव आकांक्षा पाचकुडे, विभाग अध्यक्ष स्नेहा कुडाळकर, महाराष्ट्र सैनिक अश्विनी चव्हाण आदी उपस्थित होते.














