कामगारांना मिळाली भरघोस पगारवाढ!

उरण दि. ६ (विठ्ठल ममताबादे ) : दि.३०.११.२०२२ रोजी समर्थ रायगड जनरल कामगार संघटना व M/s. Speedy Multimodes Ltd व्यवस्थापन यांच्यामध्ये करार झाला आहे. ०१ जुलै २०२२ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीसाठी युनियनच्या सभासदांना भरघोस पगारवाढ मिळाली आहे त्यामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

हा करार करत असताना M/s. Speedy Multimodes Ltd चे DGM-HR & IR राकेश कोळी, CFS Unit President दिनेश तांडेल, CFS Unit Vise President मनोज कडु व इतर कामगार वर्ग तसेच समर्थ रायगड जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष अतुल भगत व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE