भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्य यांच्याकडून अभिवादन

मुंबई, दि,६: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या  महापरिनिर्वाण दिनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पचक्र अर्पण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.

दादर येथील चैत्यभूमी येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आज शासकीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड, विरोधी पक्ष नेते अजित पवार, खासदार राहुल शेवाळे, आमदार सर्वश्री संजय शिरसाट, प्रवीण दरेकर, सदा सरवणकर, कालिदास कोळंबकर, जयंत पाटील तसेच, प्रकाश आंबेडकर, आनंदराज आंबेडकर, मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. अशोक स्तंभाजवळील भीम ज्योतीचे दर्शन घेतले.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE