महामार्गबाधित परशुराम घाटातील ग्रामस्थांच्या स्थलांतरासाठी दोन कोटींचा निधी वर्ग

मुंबई- गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम जलदगतीने काम पूर्ण करा : ना रवींद्र चव्हाण

मुंबई : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटातील ग्रामस्थांचे स्थलांतर करण्यासाठी २.०० कोटी निधी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वर्ग करण्यात आलेला आहे, तो तत्काळ संबंधितांना वितरीत करण्यात यावा, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले आहेत.

डिसेंबर- मुंबई- गोवा महामार्गावरील अपूर्ण रस्त्यांची कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत. तसेच या महामार्गावरील इंदापूर ते झाराप दरम्यानच्या चौपदीकरणाचे काम जलदगतीने पूर्ण करावीत. महामार्गावरील अपूर्ण राहिलेले कामे पूर्ण करुन जनतेला तातडीने दिलासा द्यावा अशी सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिल्या.


मुंबई-गोवा महामार्गावरील अपूर्ण राहिलेल्या कामासंदर्भात मंत्री रविंद्र चव्हाण यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग यांच्यासह संबंधित विभागाचे अधिका-यांसमवेत सविस्तर आढावा घेतला. यावेळी मंत्री चव्हाण यांनी पनवेल ते इंदापूर या मार्गावरील कासू ते इंदापूर टप्पा क्र. १, पनवेल ते कासू (वडखळजवळ) टप्पा क्र.२, आदि रस्त्याची सद्यस्थिती, या मार्गावरील दुरुस्तीचे काम, त्याचप्रमाणे इंदापूर ते झाराप या रस्त्याचे बळकटीकरण व चौपदीकरणचे कामच्या सदयस्थितीच्या कामाबद्दल आढावा घेतला. ही सर्व कामे तांत्रिकदृष्टया कशा पध्दतीने जलदगतीने पूर्ण करण्यात येतील याबाबत आवश्यक सूचना संबंधित अधिका-यांना दिल्या.


या महामार्गावरील परशुराम घाट, कशेडी घाट आदी घाट रस्त्याच्या लांबीतील उतारांचे स्थिरीकरण करुन अपघातमुक्त करण्याबाबत तसेच हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासंदर्भात सूचना मंत्री चव्हाण यांनी दिल्या. या कामातील ज्या तांत्रिक व प्रशासकीय अडचणी असतील त्या दूर करण्याच्यादृष्टीने सर्वांनी तातडीने कार्यवाही करावी असे निर्देशही मंत्री चव्हाण यांनी दिले.


परशुराम घाटातील ग्रामस्थांचे स्थानांतरण करण्यासाठी २.०० कोटी निधी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वर्ग करण्यात आलेला आहे, तो तात्काळ संबंधितांना वितरीत करण्यात यावा असे सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण यांनी यावेळी दिले.


Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE