रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील मडगाव ते मुंबई सीएसएमटी दरम्यान धावणाऱ्या वनवे स्पेशल गाडीचे बुकिंग दिनांक 14 डिसेंबरपासून खुले होणार आहे.
कोकण रेल्वे कडून या आधीच मडगाव ते मुंबई दरम्यान धावणारी वनवे स्पेशल गाडी (01430) जाहीर करण्यात आली आहे. या गाडीसाठी चे आगाऊ आरक्षण रेल्वेच्या संगणकीकृत आरक्षण खिडक्या तसेच आय आर सी टी सी या संकेतस्थळावर 14 डिसेंबरपासून खुले होत आहे















