पनवेलमधील पुष्पा परशुराम प्रतिष्ठानचा उपक्रम
उरण (विठ्ठल ममताबादे ) : दि. ११ डिसेंबर २०२२ रोजी श्रीक्षेत्र पाटणोली (पनवेल) येथे पुष्पा परशुराम प्रतिष्ठान रोजगार ऍपचा भव्यदिव्य असा शुभारंभ अध्यात्मिक क्षेत्रातील प्रसिद्ध प्रबोधनकार, प्रवचनकार भागवताचार्य महेशजी महाराज साळुंखे ह्यांच्या हस्ते संपन्न झाला.
पुष्पा परशुराम प्रतिष्ठान चे संचालक/अध्यक्ष अतुल भगत ह्यांनी यावेळी उरण व पनवेल परिसरातील सर्व बेरोजगारांना आवाहन केले आहे की सर्वांनी ह्या संधीचा फायदा घ्यावा.
https://pushpa-parshuram-pratishthan.com/
या लिंक वर बेरोजगारांनी आपले फॉर्म भरावे असे आवाहन अतुल भगत यांनी केले.


21 व्या शतकातील जगातील सर्वात मोठ्या नियोजित शहरांपैकी एक म्हणजे आपली नवी मुंबई. सिडकोने भूसंपादन करून केलेल्या या नवी मुंबई प्रकल्पामध्ये जेएनपीटी बंदर (भारतातील सर्वात मोठे कंटेनर बंदर) व त्यावर आधारित सीएफएस , नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, नवी मुंबई विशेष आर्थिक क्षेत्र- सेझ ,ओएनजीसी, बीपीसीएल आणि टी टी सी (ट्रान्स ठाणे क्रिक)एम आय डी सी यांचा समावेश आहे.या प्रकल्पांमुळे, हजारो नोकऱ्या निर्माण झाल्या आणि होणार आहेत. पण दुर्दैव असे कि स्थानिकांना व प्रकल्पग्रस्तांना प्राधान्य न देता बाहेरून भरती केली जाते. नंतर हेच बाहेरुन आलेले अधिकारी स्थानिकांना व प्रकल्पग्रस्तांना त्रास देण्याचे व अडचण निर्माण करण्याचे काम करतात.हे सगळे थांबवण्याचे उद्दिष्ट, “पुष्पा परशुराम प्रतिष्ठान”, या संघटनेचे आहे. प्रकल्पग्रस्त व स्थानिकांना, आपल्याच जमिनीवर निर्माण केलेल्या प्रकल्पांमध्ये नोकऱ्या मिळाल्याच पाहिजे. नोकऱ्या मिळवण्यासाठी एक संघटित आणि प्रामाणिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्व स्थानिकांना व प्रकल्पग्रस्तांना विनंती आहे कि पुष्पा परशुराम प्रतिष्ठानच्या रोजगार ऍप ओपन करून लिंकद्वारे अर्ज भरून द्यावे. तुमची माहिती व बियोडाटा कंपन्यांकडे पोचवून तुम्हाला रोजगार मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. पुढील माहिती तुमच्या रजिस्टर नंबरवर देण्यात येईल.या रोजगार ऍपचा जास्तीत जास्त बेरोजगारांनी फायदा घ्या. व जास्तीत जास्त नाव नोंदणी करा असे आवाहन रोजगार ऍप उदघाटन प्रसंगी अतुल भगत यांनी केले.
पुष्पा परशुराम प्रतिष्ठान ही सामाजिक संस्था असून या संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जातात.अनेक सामाजिक संस्था आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर असे विविध उपक्रम राबवित असतात मात्र या संस्थेने एक पाऊल पुढे टाकत बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्याचा संकल्प करत रोजगार ऍपची निर्मिती केली आहे. खरच हे कार्य, उपक्रम अत्यंत स्तुत्य व समाजपयोगी आहे. माझा या उपक्रमाला नेहमीच पाठिंबा व सहकार्य असेल व संस्थेचे उत्तरोत्तर प्रगती होत राहो अशा शुभेच्छा भागवताचार्य महेश महाराज साळुंखे यांनी उदघाटन प्रसंगी दिले.
कार्यक्रमाच्या वेळी माजी नगराध्यक्ष रमेश ठाकुर, अनिल भोईर, दिपेश वास्कर, नैनेश म्हात्रे, रुषिकेश ठाकूर आदी मान्य मान्यवर तसेच पुष्पा परशुराम प्रतिष्ठानचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.














