खा. राऊतांचे दोन्ही गाड्यांना संगमेश्वर स्थानकात थांबा मिळण्यासाठी रेल्वेमंत्री वैष्णव यांना साकडे
मुंबई (सुरेश सप्रे) : कोकण रेल्वे मार्गावरून धावणार्या नेत्रावती व मत्स्यगंधा या दोन्ही ट्रेनला रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर रोड या रेल्वेस्थानकावर थांबा मिळावा या मागणीकडे गेली अनेक वर्षे दुर्लक्षित असलेल्या मागणीसाठी सिंधुदुर्ग – रत्नागिरीचे खास. विनायक राऊत यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांची भेट घेत लेखी निवेदन दिले.
कोकणातील विषेशता सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्हातील जनतेच्या समस्यांप्रती सदैव सजग असलेले आणि त्या समस्या सोडविण्यास कटिबद्ध असलेले रत्नागिरी सिंधुदुर्गचे लोकप्रिय खासदार तथा लोकसभा शिवसेना गटनेते विनायकजी राऊत यांनी आपल्या लोकसभाक्षेत्रातील जनतेची मागणी लक्षात घेत ती पुर्णत्वास नेणेसाठी जातीने लक्ष देत हि समस्या मार्गी लागावी व जनतेची सोय व्हावी यासाठी पुढाकार घेतला आहे. खा. राऊत यांनी दिलेल्या निवेदनात संगमेश्वररोड हे अत्यंत महत्वाचे रेल्वेस्थानक असुन या स्थानकातुन लोक वैद्यकीय उपचार,व्यवसाय आदी करीता मुंबईकडे जात येत असतात त्यामुळे प्रति महीना मोठ्या प्रमाणात या स्थानकातून रेल्वेला महसूल प्राप्त होतो हे वेळोवेळी निदर्शनास आणुन दिले आहे.
या स्थानकावर फारच कमी गाड्या थांबत असल्यामुळे सामान्य जनतेला रेल्वे आरक्षण मिळणे हि मुश्कील झालेले आहे.तसेच स्थानिक ग्रामस्थांची व काही संघटनांनी स्थानकावर दोन्ही ट्रेननां कायम स्वरूपी थांबा मिळणेबाबतची सततची मागणी कोकण रेल्वेकडुन अद्याप पूर्ण करण्यात आलेली नाही. याकडे लक्ष वेधले व सर्व कागदपत्रही मंत्री महोदयांना देवून लवकारात लवकर या दोन्ही ट्रेननां संगमेश्वर स्थानकात थांबा देऊन प्रवाशांची गैरसोय दुर करावी अशी मागणी खा. विनायक राऊत यांनी केलेली आहे.















