विदर्भ-कोकण जोडणारी विशेष रेल्वे गाडी २६ फेब्रुवारीपर्यंत धावणार

रत्नागिरी : नागपूर ते मडगाव दरम्यान धावणाऱ्या विशेष रेल्वे गाडीला नव्या वर्षातील २६ फेब्रुवारी २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. विदर्भ, खान्देश ते कोकण प्रांत जोडणारी ही गाडी आता २६ फेब्रुवारी २०२३ पर्यंत कोकण रेल्वेमार्गे धावणार आहे.

विदर्भातून थेट कोकण रेल्वे मार्गावर येण्यासाठी रेल्वे गाडी नसल्यामुळे अशा गाडीची वारंवार मागणी होत होती. गर्दीचा हंगाम लक्षात घेऊन या मार्गावर विशेष गाड्यांचे नियोजन रेल्वेकडून करण्यात येते. दl दिवाळी व नाताळच्या पार्श्वभूमीवर नागपूर ते मडगाव (गोवा) (०११३९/०११४०) ही आठवड्यातून दोनदा धावणारी गाडी जानेवारी २३पर्यंत जाहीर करण्यात आली होती. मात्र, या गाडीची वाढती मागणी लक्षात घेऊन रेल्वेने ही गाडी २६ फेब्रुवारी २०२३ पर्यंत विस्तारित करण्याचा निर्णय घेतला आहे.

सुधारित वेळापत्रकानुसार ही गाडी नागपूर जंक्शन ते मडगाव (गोवा) पर्यंत चालवली जाणार आहे. त्यानुसार ही गाडी नागपूर जंक्शन येथून बुधवारी तसेच शनिवारी दुपारी ०३ वाजुन ०५ मिनिटांनी सुटून गुरुवार तसेच रविवारी ती मडगाव गोवाला दुसऱ्या दिवशी सायंकाळी ०५.४५ वाजता पोहोचेल.
मडगाव (गोवा) ते नागपूर जंक्शन दरम्यान धावताना ही गाडी (०११४०) गुरुवार तसेच रविवारी मडगाव गोवा येथून रात्री ८ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी रात्री ०९.३० वाजता ते नागपूर जंक्शनला पोहोचेल.मडगाव (गोवा) ते नागपूर जंक्शन दरम्यान धावताना ही गाडी (०११४०) गुरुवार तसेच रविवारी मडगाव (गोवा) येथून रात्री ०८.०० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी रात्री ९.३० वाजता ते नागपूर जंक्शनला पोहोचेल.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE