ठाकरे गट शिवसेना तालुकाप्रमुख पदाच्या निवडीकडे लक्ष


देवरूख (सुरेश सप्रे) : शिवसेना फाटाफुटीचे लोण सर्वत्र दिसत असताना ते जिल्हा पातळीपर्यंत पोहोचले असताना संगमेश्वर तालुक्यातही शिंदे गटाने जोरदार हातपाय पसरायला सुरुवात केली आहे.
शिवसेना नेते माजी मंत्री रामदास कदम व रत्नागिरीचे आमदार व उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या रूपाने एकनाथ शिंदे यांना रत्नागिरी जिल्ह्यातून हे दोन मोहरे सुरुवातीलाच मिळाले आहे. जिल्ह्यात शिंदे गटाची ताकद वाढविण्याचा विडा उचललेल्या या दोन्ही नेत्यांनी येत्या काही दिवसात जिल्हातून आणखी काही बडे नेते शिंदे गटात दाखल होणार असल्याचे जाहीर करत काही दिग्गजांच्या संर्पकात असल्याचे सांगितले होते. रामदास कदम व उदय सामंत हे शिवसेनेतील जिल्हय़ातील मोठे नेते आहेत. १०वर्षे आमदारकी भोगलेले माजी आमदार सदानंद चव्हाण व तालुका प्रमुख प्रमोद पवार हे आपल्या काही निवडक सहकारी यांचेसह ना. सामंतांच्या उपस्थितीत ठाकरेसेनेला रामराम करीत शिंदे गटात सामिल झाल्याने हे दोन्ही नेते शिवसेना फोडण्यात यशस्वी होत असल्याचे चित्र संध्यातरी दिसत आहे.
या पार्श्वभूमीवर संगमेश्वर तालुक्यातील शिवसेनेचा गड अभेद्य ठेवण्यासाठी माजी मंत्री रविंद्र माने व माजी आमदार सुभाष बने यांनी कंबर कसली असून तालुक्यात खरी शिवसेना हिच उद्धव ठाकरे शिवसेना आहे असे समर्थकांना वाटते. त्यामुळे माजी मंत्री रविंद्र माने व माजी आम.सुभाष बने हे शिवसैनिकांना आपल्याकडेच राहणेसाठी आतूर झाले असताना च रविंद्र माने यांच्या कृपेने तालुकाप्रमुख पदावर विराजमान होवून २७ वर्षे त्याच पदावर असलेले प्रमोद पवार यांनी आपल्या सहकाऱ्यांसह शिंदे गटात प्रवेश केल्याने तालुका शिवसेत खळबळ उडाली. या नंतर एकहि निष्ठांवत शिवसैनिकांनी शिंदे गटात प्रवेश करू नये यासाठी या माने-बने द्वयीने कंबर कसली आहे.. त्याची प्रचिती नुकत्याच झालेल्या ग्रा. पं. निवडणुकीत दिसून आली दिसत आहे.
मागे ना. सामंत यांच्या दौऱ्यात काही ठिकाणी कडव्या पध्दतीने आंदोलन करीत विरोधाची प्रचीती दिली होती . त्या सैनिकांचा उपनेते झालेल्या आम. राजन साळवी यांनी सत्कार ही केला.
जिल्ह्यातील विशेषता रत्नागिरी. राजापूर. लांजा. संगमेश्वर व चिपळूण या तालुक्यात माने व बने यांना शिवसैनिकांसह भाजपा. राष्ट्रवादी काँग्रेस. काँग्रेसमधे मानणारा मोठा वर्ग आहे. यापूर्वी त्यांनी सेनेत विविधपदे सांभाळली आहेत त्यांचा जनसंर्पक हि दांडगा आहे. आता ठाकरे गटाची ताकद वाढविण्यासाठी माने व बने हे या पाच तालुक्यांवर लक्ष ठेवून आहेत. त्यांच्याच सूचनेनुसार ठाकरे गटाचेच दक्षिण जिल्हाप्रमुख नियुक्त आहेत. आता प्रमोद पवार यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने रिक्त तालुका प्रमुख पदावर लवकरच नियुक्ती केली जाणार असून तालुका प्रमुख पदावर माजी जि. प. उपाध्यक्ष व कडवे शिवसैनिक म्हणून ख्याती असलेले तसेच कुणबी समाजाचे आक्रमक नेतृत्व असलेले संतोष थेराडे व माजी सभापती संतोष लाड व बंड्या बोरूकर यांची नावे चर्चेत असली तरी सध्या तरी संतोष थेराडे यांचे पारडे जड असल्याची चर्चा कार्यकर्ते करीत आहेत.
शिवसेनेतील वादावर सुप्रिम कार्ट व निवडणुक आयोगाकडे यांचेकडे तक्रारी दाखल असून त्यावर अंतिम निर्णय झालेला नसलेने अनेक जण हातचे राखून काम करताना दिसतात.काही तर दोन्ही कडे असल्याचे भासवताना दिसतात. त्या निकालानंतरच वा आगामि जिप व पंस. निवडणूक जाहीर होताच अनेकजण आपले भविष्यातील बस्तान व्यवस्थितपणे कुठे बसविले जाईल याचा विचार करूनच निर्णयाप्रत येतील असेच आजचे चित्र दिसत आहे..














