राष्ट्रीय अपंग विकास महासंघातर्फे दिव्यांग आनंद मेळावा

हाताखंबा : राष्ट्रीय अपंग विकास महासंघ आणि संजीवन दिव्यांग विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आनंद मेळावा दि २५ डिसेंबर २०२२रोजी लिंगायत मंगल कार्यालय पाली येथे उत्साहात संपन्न झाला. यावेळी रत्नागिरी महसूलचे अधिकारी मिलिंद देसाई, नायब तहसीलदार श्रीम. माधवी कांबळे, श्री. सागर शिंदे, श्री. परिमल डोर्लेकर, श्री.सुमित कोळंबेकर , श्री. स्वप्नतेज मयेकर, श्री. चौगुले (खानु तलाठी), श्री.शिवलकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते. 

या कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या आनंद मेळाव्याअंतर्गत दिव्यांगाना पेंशन योजनेचे फॉर्म भरण्यात आले, आधार कार्ड अपडेट, आधार कार्ड kyc मतदान आधार कार्ड लिंक करणे असे विविध प्रश्न दिव्यांगाचे सोडविण्यात आले.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE