घाटातील अवघड वळणावर घडली दुर्घटना
साखरपा : रत्नागिरी -कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाटातील एका वळणाजवळ सोमवारी सकाळी सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास टँकरवर दुचाकी आदळून झालेल्या अपघातात स्वराचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातात प्राण गमावलेला दुचाकीस्वार सातारामधील कराडचा रहिवासी आहे.
या अपघातात लालासो खाशबा शेवाळे (५६ ) यांनी आपला प्राण गमावला आहे. मिळालेल्या माहितीनुसार ते साताऱ्यातील कराडचे रहिवासी होते. ते आपल्या ताब्यातील (MH 50 Q 6184) मोटारसायकलने रत्नागिरीच्या दिशेने प्रवास करीत होते तर टँकर (MH10 CQ-5586) रत्नागिरी ते कोल्हापूरच्या दिशेने जात होता. आंबा घाटातील अवघड वळणाजवळ दोन्ही वाहने आली असता मोटारसायकल टँकरवर जाऊन धडकली.
रुग्णवाहिकेतून मृतदेह आणि साखरपा येथे नेऊन तेथे याची उत्तरे तपासणी करण्यात आली. नंतर पुढील सोपस्कारंसाठी तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. साखरपा येथील पोलीस दूरक्षेत्रात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.















