भारतात प्रथमच रत्नागिरी जिल्ह्यातील दोन समुद्रकिनारे कासवांसाठी राखीव

आंजर्ले, वेळास गावाला मिळाली कासवांचे गाव म्हणून ओळख
कासव संवर्धनातील कामाची राष्ट्रीय स्तरावरून दखल

दापोली : रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगडमधील वेळास दापोलीतील आंजर्ले या गावांना आता कासवांचे गाव’ म्हणून नवी ओळख मिळाली आहे. ऑलिव्ह रीडले या दुर्मिळ कासव प्रजातीच्या गावाच्या योगदानाची दखल घेत राष्ट्रीय स्तरावर या दोन्ही गावांना नवीन ओळख मिळाली आहे.


भारतीय वन सेवा अपर प्रधान मुख्य वनरक्षक डॉ. व्ही. क्लेमेंट बेन यांनी डिसेंबरच्या पहिल्या  दोन्ही गावांना भेट देऊन कासव संवर्धनासाठी तेथे होत असलेल्या कामाची प्रशंसा होती.
मागील अनेक वर्षांपासून मंडणगडमधील  वेळास तसेच दापोलीतील आंजर्ले समुद्रकिनाऱ्यावर कासव संवर्धनासाठी भरीव असे काम झाले आहे. कासवाच्या वेळीच्या हंगामात दूरवरचा सागरी प्रवास करून कासव माझ्या वेळेस तसे सांगितले समुद्रकिनारी अंडी घालण्यासाठी येत असतात. ही बाब हेरून या दोन्ही किनाऱ्यावर कासव प्रेमी नागरिकांकडून कासवाची अंडी संवर्धन करून त्यातून पिल्ले निघेपर्यंत त्यांची काळजी घेतली जाते. यातूनच पुढे या किनाऱ्यावर कासव महोत्सव ही भरू लागले.


राष्ट्रीय क्षेत्रा वरील वन अधिकाऱ्यांकडून या गावांमध्ये कासव संवर्धनासाठी होत असलेल्या कार्याची दखल घेऊन देशपातळीवर वेळास तसेच आंजर्ले गावाला कासवांचे गाव म्हणून ओळख मिळाली आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE