चिरणीत येथे हरिनाम व ज्ञानेश्वरी पारायण सप्ताहास प्रारंभ

देवरूख : हनुमान सेवा प्रासादिक भजन मंडळ मौजे चिरणी ता.खेड यांचे वतिने हनुमान मंदीरात अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या सोहळ्याची घटस्थापना हभप दत्ताराम आंब्रे व हभप शांताराम आंब्रे याचे हस्ते करण्यात आली. हा सोहळा १९ जानेवारी पर्यंत चालणार असून दररोज पहाटे ४ते ६ काकडा आरती. ८ते १२ ज्ञानेश्वरी पारायण. १ ते ३ महाप्रसाद. ४ते ६ प्रवचन ६ ते ७ हरिपाठ. रात्रौ ९ ते ११ किर्तन व हरीजागर सपंन्न होणार आहे. दि १८ जानेवारी रोजी प्रसिध्द शिव चरित्र व्याख्याते प्रा. नितिन बानगुडे पाटील यांचे व्याख्यान आयोजित केले आहे.


चिरणी गावाशी असलेले जिव्हाळ्याचे नाते अधिक दृढ करणेसाठी प्रवचन. पारायण. व किर्तन या सह शिव चरित्र व्याख्यान श्रवणाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाचेवतीने करणेत आले आहे..

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE