रत्नागिरी जिल्ह्यातील सुवर्णपदकप्राप्त तायक्वांदोपटू विभागीय स्पर्धेसाठी रवाना

स्पर्धा साताऱ्यात उद्यापासून सुरू होणार

रत्नागिरी : क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या विद्यमाने तथा जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा कार्यालय रत्नागिरी यांच्या वतीने व रत्नागिरी तायक्वांडो स्पोर्ट्स असोसिएशन व शाहनूर चिपळूण तालुका तायक्वांदो अँकॅडमीच्या सहकार्याने जिल्हास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धा 14/17/19 वयोगटामध्ये क्रीडा संकुल डेरवण (सावर्डा) या ठिकाणी संपन्न झाल्या होत्या. या स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक पटकाविलेल्या खेळाडूंची निवड कोल्हापूर विभागीय शालेय तायक्वांदो स्पर्धेसाठी झाली आहे.

या विभागीय स्पर्धा 16 ते 18 जानेवारी दरम्यान श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल सातारा या ठिकाणी संपन्न होणार असून या स्पर्धेसाठी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली या 5 जिल्ह्यातील खेळाडू सहभागी होणार आहेत.
यात रत्नागिरीतील आदया अमित कवितके, राधिका दर्शन जाधव, त्रिशा सचिन मयेकर, गायत्री यंशवत शेलार,
गौरी अभिजीत विलणकर, सई सावंत, अमेय सावंत, सार्थक चव्हाण, मृदुला पाटील, आदीष्टी काळे, ऋत्विक तांबे, समर्था बने, कृपा मोरये, देवन सुपल, श्रेयस वाडेकर, संस्कृती केतकर हे खेळाडू सहभागी होणार आहेत.


या सर्व खेळाडूंना जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर, जिल्हा संघटना अध्यक्षा, राज्य संघटना सदस्य व्यंकटेश्वरराव कररा, जिल्हा संघटनेचे सचिव लक्ष्मण कररा,कोषाध्यक्ष शशांक घडशी, तालुका समन्वयक मुश्ताक आगा यांनी शुभेच्छा दिल्या. या सर्व खेळाडूंना शाहरुख शेख, प्रशांत मकवना, मिलिंद भागवत यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE