मुंबई-गोवा महामार्गावर पालीनजीक खड्डयात दुचाकी आदळून स्वार जागीच ठार

रत्नागिरी : चौपदरी करण्याचे काम सुरू असलेल्या मुंबई – गोवा महामार्गावरील खड्ड्यांनी दुचाकिस्वाराचा बळी घेतला. पालीनजिक शनिवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास दुचाकीचा अपघात होऊन दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. प्रदीप प्रभाकर धाडवे ( 30, रा.पाथरट, पाली) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव समजले आहे.

प्रदीप धाडवे दुचाकीवरून पालीहून रत्नागिरीच्या दिशेने प्रवास करीत होता. यावेळी पाली नजिक उभी धोंड येथे आला असता खड्ड्यात जोरदार गाडी आदळून त्याचा अपघात झाला. या अपघातात प्रदीप धाडवेच्या डोक्याला गंभीर स्वरूपाचा मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच पाली पोलीस दुरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मोहन कांबळे, पोलीस हेडकॉन्स्टेबल संतोष कांबळे, पोलीस नाईक राकेश तटकरी घटनास्थळी दाखल झाले. महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. व धाडवे याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE