नायशी विद्यालयातील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

देवरूख : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधून घेण्यात आलेल्या हस्ताक्षर निबंध स्पर्धेत नायशीहायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.


लाखो साहित्यिकांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणारी भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच तथा फ्रीडम स्टोरी ऑफ इंडिया जिल्हा रत्नागिरी/सिंधुदुर्ग अंतर्गत रोजी झालेल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षा ज्योती जयंत पवार यांनी त्यांच्या कळंबुशी गावातील ह. भ.प. श्री. आ. बा. सावंत.माध्यमिक विद्यालय नायशी मधील इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांची सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित हस्ताक्षर/निबंध स्पर्धा आयोजित केली होती. त्या स्पर्धेत एकूण अठरा विद्यार्थी सहभागी होऊन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या स्पर्धेत प्रथम क्रमांक:-कु.अनन्या शिवराम चांदिवडे.
व्दितीय क्रमांक : कु.श्रेया मुकेश आग्रे.
तृतीय क्रमांक : कु. राज महेश चांदिवडे.
तर उत्तेजनार्थ क्रमांक:- १) कु.निधी सचिन चव्हाण.
२)कु.विराट रविंद्र शिगवण.असे पाच विद्यार्थी प्रथम द्वितीय तृतीय उत्तेजनार्थ मानांकनाचे मानकरी ठरले.


दि. २६ जानेवारी ला विद्यार्थी गुणगौरव सोहळा पार पडला. त्या सोहळ्यास भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच तथा फ्रीडम स्टोरी सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षा/परीक्षक कु.ज्योती पवार तसेच सिंधुदुर्ग कोषाध्यक्ष गौतम सांगेल. साहित्यिक मित्र बाबू वरक तसेच नायशी विद्यालयाचे अध्यक्ष, मान्यवर प्रमुख पाहुणे, माजी शिक्षक वर्ग उपस्थित होते.स्पर्धा निकाल सोबत प्रजासत्ताक दिनी श्री छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले या महामानवांची मुलांना पुस्तके वाटप करून महामानवांचे विचार विद्यार्थ्यांमध्ये पेरून विद्यार्थ्यांनी यशाची उंचच उंच शिखरे गाठावीत. आणि भारताचे, राज्याचे, आपल्या जिल्ह्याचे, गावाचे, आईवडिलांचे नाव रोशन करावे या उद्देशाने हस्ताक्षर व निबंध स्पर्धा घेऊन.२६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी बक्षिस देण्यात आली आणि पुस्तक वाटप उपक्रम राबविण्यात आला.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE