प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली घोषणा
मुंबई- १७ मार्च- २०२३- देशात तसेच राज्यात ही पहिल्या क्रमांकवर असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते पदांची नियुक्ती करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी समीर गुरव यांची भाजपा महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी निवड केली आहे.

भाजपा सोशल मीडिया सांभाळण्याचा दीर्घ अनुभव असलेले तसेच प्रसार माध्यमांमध्ये पक्षाची समर्पक भूमिका मांडण्यासाठी समीर गुरव यांची निवड योग्य असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
