रत्नागिरी, रायगडसह पुणे साताऱ्यात पुढील ४ तासात वादळी पावसाचा इशारा

मुंबई वेधशाळेचा इशारा ; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन


रत्नागिरी दि. 21 :- रत्नागिरी व रायगड सह राज्यातील पुणे सातारा आणि नंदुरबार या जिल्ह्यात येत्या चार तासात वीजांच्या कडकडाटसह वादळी पाऊस पडेल असा अंदाज मुंबई येथील वेधशाळेने व्यक्त केला आहे.

या कालावधीत ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारा वाहण्याची शक्यता या जिल्ह्यांमध्ये काही तुरळक ठिकाणांवर असल्याचे वेधशाळेने जारी केलेल्या बातमीपत्रात म्हटले आहे.
या संदर्भात नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE