पनवेल : पनवेल येथे सोमवारी राज्यपाल श्री. रमेश बैस यांच्या हस्ते कौशल्य विकास विद्यापीठाच्या इमारतीचे भूमिपजन करण्यात आले. या कार्यक्रमात रत्नागिरीसाठी महत्वपूर्ण घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कौशल्य विकास विद्यापीठाचे उपकेंद्र रत्नागिरीत होणार आहे. या कार्यक्रमावेळी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.















