रत्नागिरी : राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी व रायगड जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत हे रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम बुधवारी सायंकाळी उशिरा जाहीर झाला आहे.
गुरुवार 30 मार्च 2023 रोजी सकाळी 09.10 वाजता खारपाडा टोल प्लाझा जवळील हेलिपॅड, खारपाडा गांव, तालुका पेण, जि.रायगड येथून हेलिकॉप्टरने पाली, ता. जि. रत्नागिरीकडे रवाना. सकाळी 09.15 वा. पासून 11.45 वा. नितीनजी गडकरी, केंद्रीय मंत्री यांच्या समवेत इंदापूर ते वाकेड रा.म. क्र.६६,महामार्गाची हवाई पाहणी. सकाळी 11.45 वाजता नितीनजी गडकरी, केंद्रीय मंत्री महोदयांसमवेत हेलिकॉप्टरने पाली हेलिपॅड,
ता. जि. रत्नागिरी येथे आगमन व पाली निवासस्थान येथे राखीव. दुपारी 12.15 वाजता पाली ता. जि. रत्नागिरी येथून मोटारीने नाणिजधाम, जि. रत्नागिरीकडे प्रयाण. दुपारी 12.30 वाजता नाणिजधाम, जि. रत्नागिरी येथे आगमन व राखीव. दुपारी 12.30 वा. ते दुपारी 01.00 वा. नितीनजी गडकरी, केंद्रीय मंत्री महोदयांसमवेत भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ: नाणिजधाम, जि. रत्नागिरी) दुपारी 01.00 वाजता नाणिजधाम येथून मोटारीने पाली, ता. जि. रत्नागिरी कडे प्रयाण. दुपारी 01.10 वाजता पाली हेलिपॅड ता. जि. रत्नागिरी येथे आगमन. दुपारी 01.15 वाजता पाली हेलिपॅड ता.जि. रत्नागिरी येथून हेलिकॉप्टरने रत्नागिरी विमानतळ कडे प्रयाण.दुपारी 01.30 वाजता हेलिकॉप्टरने रत्नागिरी विमानतळ येथे आगमन व मोटारीने एम.आय.डी.सी विश्रामगृह, रत्नागिरी कडे प्रयाण.
दुपारी 01.40 वा. ते दुपारी 02.10 वा. नितीनजी गडकरी, केंद्रीय मंत्री महोदयांसमवेत पत्रकार परिषद. (स्थळ : एम. आय. डी. सी विश्रामगृह, रत्नागिरी) दुपारी 02.10 वाजता एम. आय. डी. सी विश्रामगृह येथून मोटारीने रत्नागिरी विमानतळ येथे आगमन व राखीव.
सोईनुसार शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथे आगमन व राखीव. सायंकाळी 05.50 वाजता शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथून मोटारीने रत्नागिरी रेल्वे स्थानक कडे प्रयाण. सांयकाळी 06.15 वाजता रत्नागिरी रेल्वे स्थानक येथून जनशताब्दी एक्सप्रेसने मुंबई कडे प्रयाण.















