मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार : ना. नितीन गडकरी

रत्नागिरी : रखडलेल्या मुंबई गोवा चौपदरी राष्ट्रीय महामार्गाचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण करून त्यापुढील जानेवारी महिन्यात हा राष्ट्रीय महामार्ग चौपदरी वाहतुकीसाठी पूर्णपणे खुला झालेला असेल, अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी दुपारी रत्नागिरी येथे पत्रकारांशी बोलताना केली.

ना. गडकरी यांनी आज रायगड ते रत्नागिरी जिल्ह्यात वाकेड पर्यंत रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाची हेलिकॉप्टरद्वारे हवाई पाहणी केली. या दरम्यान अधिकाऱ्यांकडून आढावा घेतल्यानंतर डिसेंबरपर्यंत अरवली ते वाकेड या रखडलेल्या टप्प्यासह उर्वरित काम मार्गी लावून डिसेंबर 2023पर्यंत हा महामार्ग पूर्ण करू अशी ग्वाही दिली. जानेवारी 2024 मध्ये मुंबई गोवा संपूर्ण चौपदरी मार्ग वाहतुकीसाठी खुला झालेला असेल, असेही ते म्हणाले.

VUP ची कामे मार्गी लावणार

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी सकाळी रायगड जिल्ह्यातून रत्नागिरी जिल्ह्याच्या दिशेने मुंबई गोवा महामार्गाचे हवाई पाहणी करत हेलिकॉप्टरद्वारे रत्नागिरीकडे प्रस्थान केले. ही हवाई पाहणी केल्यानंतर मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील भुयारी मार्ग अंतर्गत तयार केलेलल्या मार्गिकां पैकी एक मार्गीका येत्या पावसाळ्यापूर्वी खुली करण्यात येईल, अशी माहिती ना. गडकरी यांनी दिली. हा संपूर्ण महामार्ग डिसेंबरपर्यंत आपण पूर्ण करू, जानेवारी 2024 मध्ये मुंबई गोवा चौपदरी राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक पूर्णपणे खुली झालेली असेल, अशी माहिती गडकरी यांनी यावेळी दिली. व्हेईकल अंडरपास VUP चे काही प्रस्ताव आले आहेत. त्यांची कामे देखील मार्गी लावली जातील, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी दिली.

या दौऱ्यात ना. गडकरी यांच्या समवेत रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हेही उपस्थित होते.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE