देवरूख (सुरेश सप्रे) : जानेवारी 2023 रोजी घेण्यात आलेल्या ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेमध्ये पी.एस. बने इंटरनॅशनल स्कूल साडवलीच्या 22 विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. त्यामध्ये 12 विद्यार्थ्यांनी गोल्ड मेडल, 8 विद्यार्थ्यांनी सिल्वर मेडल व 2 विद्यार्थ्यांनी ब्राँझ पदक प्राप्त केली आहेत.
यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे महाराष्ट्रीयन शिक्षण संस्थेचे सचिव व माजी आ. डॉ. सुभाष बने, संचालक रोहन बने, प्राचार्य प्रदिश कलंगडन सर, पर्यवेक्षक सोमनाथ कुंभार यांनी सर्व विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.















