चक्कीच्या पट्ट्यात पाय अडकून मालक गंभीर ; कोल्हापूरला हलवले

रत्नागिरी : येथील रामआळी भागात पीठ व मसाल्याच्या चक्कीतील पट्ट्यात पाय अडकून चक्कीमालक गंभीर जखमी झाला आहे. शनिवारी सायंकाळी उशिराने ही घडली. यातील जखमीला गंभीर अवस्थेत कोल्हापूरला उपचारासाठी नेण्यात आले आहे.

शहरातील तेली आळी येथे राहणारे अनिल भार्गव पोटफोडे (५७) यांची राम आळी येथे पीठ व मसाला गिरण आहे शनिवारी सायंकाळी गिरणीमध्ये काम सुरू असताना गिरणीच्या बेल्ट मध्ये पाय अडकून ते मशीन मध्ये खेचले गेले या त्यांच्या दोन्ही पायाला गंभीर दुखापत झाली सून त्यांना तातडीने परिसरातील व्यावसायिकांनी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले त्यांची प्रकृती गंभीर असल्याने अधिक उपचारासाठी त्यांना कोल्हापूर येथे हलवण्यात आले आहे

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE