रायगडमधील स्पर्धा परीक्षार्थींसाठी ‘गुड न्यूज’!

पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते आज कायमस्वरूपी अभ्यास केंद्राचे उद्घाटन


अलिबाग : रायगडचे तत्कालीन जिल्हाधिकारी आणि सध्याचे कोकण विभागीय कोकण आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून रायगड जिल्ह्यात सर्व तालुक्यांमधून जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता “गरुडझेप” स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करण्यात आले होते. या माध्यमातून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या मुलांना प्रत्यक्ष मार्गदर्शन, ऑनलाईन मार्गदर्शन तसेच स्पर्धा परीक्षेची पुस्तके विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आली होती.


याचेच पुढचे पाऊल म्हणून स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना कायमस्वरूपी अभ्यास केंद्र मिळावे, या हेतूने तालुक्याच्या ठिकाणी जिल्हा स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्र व अभ्यासिका उभे करण्याचे काम प्रगतीपथावर आहे.
त्यातील एक अलिबाग येथील “जिल्हा स्पर्धा परीक्षा केंद्र व अभ्यासिका” ही नूतन वास्तू दिमाखात उभी राहिली आहे.


या नवीन वास्तूचे उद्घाटन मा.पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते व कोकण विभागीय आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर, जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सोमवार, दि. 3 एप्रिल 2023 रोजी सकाळी 11 ते 11.30 च्या दरम्यान संपन्न होणार आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE