नवी दिल्ली : देशात कोव्हिड बाधितांचा आकडा वाढत असताना भारताने 10 एप्रिल रोजी दोन दिवसीय कोविड सज्जता मॉक ड्रिल सुरू केले. आरोग्य मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, या ड्रिलचा उद्देश रूग्णांच्या चाचणी आणि उपचारांसाठी योग्य व्यवस्थेचा आढावा घेणे आणि खात्री करणे हे होते.

राजस्थान, मध्य प्रदेश, बिहार, कर्नाटक आणि मुंबईतील सर्व प्रमुख सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये मॉक ड्रिल घेण्यात आल्याचे आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी सोमवारी सांगितले














