रत्नागिरी : रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील मावळंगे येथील गझनेवाडी – बहुतुलेवाडी ह्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन ज्येष्ठ उद्योजक रविंद्र तथा अण्णा सामंत यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सोबत शिवसेना तालुकाप्रमुख महेश तथा बाबूशेठ म्हाप, महिला जिल्हाप्रमुख शिल्पाताई सुर्वे, जिल्हा कार्यालयप्रमुख प्रशांत सुर्वे, उपतालुकाप्रमुख सुनील नावले, विभागप्रमुख विजय चव्हाण, उपविभागप्रमुख संतोष तोडणकर, विभागसंघटक अजय तेंडुलकर, महिला विभागप्रमुख स्मिता भिवंदे, भाऊ धूळ, गावकार श्री. बहुतुले हयांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.















