केरळमधील अलप्पुडा जिल्ह्यात कयामकुलम गावातील मस्जिद कमिटीचे अनोखे उदाहरण
अलप्पुडा : बाप नसलेल्या गरीब हिंदू मुलीचे लग्न वधूला १० तोळे सोनं घालून, रोख २ लाख रुपये देऊन व १,००० लोकांचे भोजन करून हिंदू पद्धतीने लावून देणारी केरळमधील मस्जिद ही जगातील असं उदाहरण घालून देणारी पहिली मस्जिद ठरली आहे. मतांसाठी समाजात भांडणे लावून आपली पोळी भाजून घेण्यार्या सर्व राजकीय पक्षांसाठी ही सणसणीत चपराक ठरली आहे.

केरळमधील अलप्पुडा जिल्ह्यातील कयामकुलम गावातील अशोकन यांचे निधन झालेल्या अत्यंत गरीब कु. अंजू (वय २२) हिचे लग्न ठरले होते. परिस्थिती हलाखीची असल्याने लग्नासाठी पैसे जमा करण्यास असमर्थ असल्याने कु. अंजूच्या आईने गावातील मस्जिद कमिटीकडे लग्नासाठी मदत मागितली.
शरत लग्न चेरुवल्ली जमात कमिटीची मदत घेतली. मस्जिद कमिटीचे सचिव नुजुमुद्दीन अलुमुद्दीन यांनी कमिटीत चर्चा करून कु. अंजूच्या लग्नाबाबत एक अभूतपूर्व निर्णय घेतला.
मस्जिद कमिटीने कु.अंजूच्या लग्नपत्रिका छापून घेतल्या. १,००० लोकांचे शाकाहारी भोजन तयार केले. कु. अंजूला एकेक तोळ्याची दहा सोन्याची नाणी लग्नात दिली. शिवाय लग्न खर्चासाठी दोन लाख रुपये दिले.
मस्जिद परिसरात हिंदू पद्धतीने मंत्रोच्चारात लग्न लावून दिले. सात फेऱ्यांचा विधीही पार पाडला. कयामुकुलम गावातील सर्व हिंदू, मुस्लिम व अन्य जातीचे देखील लोक उपस्थित होते. सर्वांनी डोळे भरून हा अद्भुत लग्न सोहळा साश्रू नयनांनी पाहिला.
कु. अंजू व अंजूची आई यांच्यासाठी हा विवाह सोहळा म्हणजे स्वप्नवतच होता. अंजूच्या आईंने मस्जिद कमिटीचे अध्यक्ष, सचिव, सर्व सदस्यांसमोर नतमस्तक होऊन आभार मानले.
संपूर्ण भारतवासीयांचसाठी एका मस्जिदने केलेली कृती दिशादर्शक व मार्गदर्शन करणारी आहे. मतांसाठी जातीजातीत भांडणे लावून आपल्या सत्तेची पोळी भाजून घेणार्या सर्वच राजकीय पक्षांसाठी ही आपल्या कृतीतून दिलेली सणसणीत चपराक ठरली आहे.














