‘शिवशाही’ ऐवजी पाठवली साधी बस!

रत्नागिरी एसटी आगाराच्या अनागोंदी कारभाराचा प्रवाशांना फटका

संगमेश्वर : रविवार दि.२३ एप्रिल रोजी रत्नागिरी आगारातून रात्री ८-३० वाजता सुटणारी शिवशाही रत्नागिरी -बोरिवली बस संगमेश्वर बस स्थानकामध्ये सुमारे दोन तास उशिरा म्हणजेच रा ११-३० दाखल झाली व साधी बस पाहून प्रवाशांचा पारा चढला. परंतु वा नियंत्रकांकडून कोणत्याही प्रश्नाचं समर्पक उत्तर मिळाले नाही. अखेर रां १२ वा बस मार्गस्थ झाली.

या बसमधील प्रवाशांचे शुक्लकाष्ठ एवढ्यावरच थांबले नाही तर ही बस सकाळी ७ वा. सुमारास बेलापुर येथे पोचली असता गाडीचा टायर पन्कचर झाल्याचे सांगून सर्व प्रवाशाना बसमधून उतरवण्यात आले. पर्यायी व्यवस्था न झाल्यामुळे प्रवाश्याना मोठ्या आर्थिक भुर्दंडासह इच्छीत स्थळ गाठावे लागले.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE