रत्नागिरी-पुणे पहिली अनारक्षित समर स्पेशल उद्या दुपारी सुटणार

रत्नागिरी : आयत्यावेळी प्रवासाचे नियोजन करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांना रेल्वेने खुशखबर दिली आहे. पुणे- रत्नागिरी तसेच रत्नागिरी ते पनवेल या मार्गावर अनारक्षित गाड्यांच्या विशेष फेऱ्या जाहीर करण्यात आल्या आहेत. यानुसार रत्नागिरी ते पुणे मार्गावरील पहिली अनाारक्षित गाडी शनिवारी दुपारी एक वाजता पुण्यासाठी सुटणार आहे.

या संदर्भात कोकण रेल्वेकडून प्राप्त माहितीनुसार गाडी क्र. ०११३१ पुणे जं. – रत्नागिरी अनारक्षित विशेष (साप्ताहिक) पुणे जंक्शन येथून दि. 04/05/2023, 11/05/2023, 18/05/2023 आणि 25/05/2023 रोजी म्हणजे दर गुरुवारी 20:50 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 7.30 वाजता रत्नागिरीला पोहोचेल.

गाडी क्र. 01132 रत्नागिरी – पुणे जं. अनारक्षित विशेष (साप्ताहिक) रत्नागिरी येथून दर शनिवारी 06/05/2023, 13/05/2023, 20/05/2023 आणि 27/05/2023 रोजी 13:00 वाजता सुटून पुणे जंक्शनला त्याच दिवशी 23:55 वाजता पोहोचेल.

ही गाडी लोणावळा, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड स्थानकावर

थांबणार आहे.

त्या गाडीला एकूण 22 डबे असतील. यात सामान्य – 20 कोच, SLR – 02 याप्रमाणे कोचरचना असेल.

गाडी क्र. 01133 / 01134 रत्नागिरी – पनवेल – रत्नागिरी अनारक्षित विशेष (साप्ताहिक)

ही गाडी क्र. 01133 रत्नागिरी – पनवेल अनारक्षित विशेष (साप्ताहिक) रत्नागिरी येथून 05/05/2023, 12/05/2023, 19/05/2023 आणि 26/05/2023 रोजी दर शुक्रवारी 13:00 वाजता सुटून ती ट्रेन त्याच दिवशी 20.30 वाजता पनवेलला पोहोचेल.

गाडी क्र. 01134 पनवेल – रत्नागिरी अनारक्षित विशेष (साप्ताहिक) पनवेल येथून 05/05/2023, 12/05/2023, 19/05/2023 आणि 26/05/2023 रोजी दर शुक्रवारी 21:30 वाजता सुटेल. ट्रेन दुसऱ्या दिवशी 04:30 वाजता रत्नागिरीला पोहोचेल.

ही गाडी संगमेश्वर रोड, आरवली रोड, सावर्डे, चिपळूण, खेड, वीर, माणगाव आणि रोहा स्थानकावर थांबेल.

या गाडीला एकूण 22 कोच असतील. यात सामान्य – 20 कोच, SLR – 02 डबे असतील.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE