बारसू येथील रिफायनरीसाठी ड्रिलिंगचे काम सुरळीत सुरू

जिल्हा प्रशासन आणि पोलीस परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यात यशस्वी

रत्नागिरी : आंदोलकांनी आज (दि.5 मे 2023) रोजी सकाळी 11 वाजल्यापासून ठिकठिकाणी जमाव करून ड्रिलच्या कामामध्ये अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलीस विभागाने तत्काळ आवश्यक ती कार्यवाही करून आंदोलकांना ड्रिलचे काम सुरू असलेल्या ठिकाणी पोहोचू न देता आंदोलकांची पांगापांग केली. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बारसू येथील परिस्थितीवर व्यवस्थित नियंत्रण ठेवले असून ड्रिलचे कामही सुरळीत सुरु असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.


या आंदोलनात सहभागी ग्रामस्थ श्री.अमोल बोळे व इतरांनी आम्हाला शेतीविषयक कामे करण्यासाठी व घरी जाण्यास प्रशासन crpc144 कायद्यानुसार रोखत असून हे आदेश तात्काळ मागे घ्यावेत, अशी याचिका मुंबई हायकोर्ट येथे दाखल करण्यात आली होती. त्यानुषंगाने मा.न्यायाधीश, उच्च न्यायालय, मुंबई यांचे आदेश मागे घेण्याच्या निर्णयास 24 तास पूर्ण होण्यापूर्वीच अमोल बोळे, कमलाकर गुरव व इतरांनी आंदोलनात सहभाग घेतल्याने
अमोल बोळे व कमलाकर गुरव यांना अटक करण्यात आली आहे.


या सर्व घटनांनंतर पोलिसांनी परिस्थितीवर व्यवस्थित नियंत्रण ठेवले असून ड्रिलचे कामही
सुरळीत सुरु आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE